- Sonali Kumkar
माझा होशील ना | पान क्रमांक १
तस लिहिण्यासाठी खूप काही आहे , पण सुरुवात कुठून करावी हे समजणं अवघड आहे .कारण मी कधी त्याच्याबद्दल एवढा गूढ विचार कधी केलाच नाही , जस चालू होत तसच सुरु होत आयुष्य.
एवढ्या ठेच लागल्यानंतर माणसाला दुसऱ्यांदा ठेच लावून घ्याची नसते ,जखमेचा दु:ख सहन करत असताना कोणी याव न चांगल बोलाव ,कधी चांगल तर वाटते तर कधी नको पण . अश्या नको असलेल्या परिस्थिती मध्ये तो आला आणि कायमचा राहिला .तो म्हणजे माझा वैभू…
माझा आणि त्याचा भेटणं एक संजोग होता ,काकू च्या घरी असतांना एक काँल वर त्याची आणि माझी भेट झाली .मला UPSC बद्दल जाणून घेण्याची खूप उत्स्तुक्ता होती आणि मी त्याला त्याच करणामुळे काँल केला ,हळूहळू काँल नंतर WhatsApp MSG वर बोलन चालू झला .तो दिवस मला आठवत नाही पण मी त्याला काँल केला , तेव्हा तो औरंगाबाद ला होता Just थोडा बोलन झाल, त्यानंतर त्याचा कधी काँल आलाच नाही .त्याचा फोन नेहमी Switch Off असायचा.
मी काँल केला तेव्हाच तो बोलायचा ,असाच आमच अधून-मधून बोलन चालू असायच.तो बोलताना खूप शांतपणे बोलायचा. नंतर हळूहळू आमच बोलन वाढत गेल , वेगवेगळी Discussions चालायची . त्याला बोलतना त्याचे विचार माझ्या विचारा सारखे वाटू लागले ,माझी खूप इच्छा असायची त्याला बोलण्याची ,हे चक्र असच खूप दिवस चालू राहील .
Date:05/08/2020